प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तुंग उद्दिष्ट ठेवले पाहिजे - लोकनेते रामशेठ ठाकूर

 आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड- डॉ.प्रदीप कामथेकर 

प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तुंग उद्दिष्ट ठेवले पाहिजे - लोकनेते रामशेठ ठाकूर 



पनवेल(प्रतिनिधी) शिक्षण कधीही वाया जात नाही आणि मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व अधिक आहे, त्यामुळे आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सी.ए. डॉ.प्रदीप कामथेकर यांनी खांदा कॉलनी येथे आज (दि. १३) केले. 

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्तयेथे प्रथमद्वितियतृतीय वर्ष पदवी  पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे  स्फुर्तिस्थान स्व.चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून  संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होत्या. या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख,पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सीता पाटील,   संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य डॉ. एसकेपाटील आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली .

           स्वर्गीय चांगु काना ठाकूर यांचे पुण्य स्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विध्यार्थ्यांना रोख पारितोषिकसन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  

 डॉ.प्रदीप कामथेकर यांनी, “माणसाने  आयुष्यात नेहमी सक्रिय विद्यार्थी बनून सातत्याने अभ्यास करत ज्ञानसंपादन केले पाहिजे. असे सांगतानाच १०० टक्के प्रयत्न म्हणजेच यशाची खात्री असते, असे अधोरेखित केले.  तसेच आई वडिलांचे ऋण लक्षात ठेविले पाहिजे, असेही नमूद केले. 

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात पारितोषिक प्राप्त विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तुंग उद्दिष्ट ठेवले पाहिजे असे नमूद करत त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रो.(डॉ.एसके. पाटील यांनी कौतुक केले व महाविद्यालयाच्या कीर्तीचा मागोवा घेतला. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी परिषद तथा विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. एम. ए. म्हात्रेआय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. बी. डी. आघाव व महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. आर.डी.म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. डॉ. आर. व्ही. येवलेप्रा. डॉ. जिएस. तन्वरप्रा. ए. व्हीपाटील यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा.एस.. परकाळे यांनी केले.                                    

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image