जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 20 मि.मी. पावसाची झाली नोंद

 

 जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 20 मि.मी. पावसाची झाली नोंद

 


अलिबाग, दि.21(जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 20.46 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.01 जून 2022 पासून आज अखेर एकूण सरासरी 1 हजार 698.84 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

        आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

      अलिबाग-43.00 मि.मी., पेण-33.00 मि.मी., मुरुड-18.00 मि.मी., पनवेल-21.00 मि.मी., उरण-28.00 मि.मी., कर्जत-27.20 मि.मी., खालापूर-20.00 मि.मी., माणगाव-8.00 मि.मी., रोहा-10.00 मि.मी., सुधागड-7.00 मि.मी., तळा- 19.00 मि.मी., महाड- 17.00 मि.मी., पोलादपूर- 26.00 मि.मी, म्हसळा-10.00 मि.मी., श्रीवर्धन-7.00 मि.मी., माथेरान-33.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 327.40 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 20.46 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 54.78 टक्के इतकी आहे.

      रायगड जिल्ह्यात मागील वर्षी दि.21 जुलै 2021 रोजी सरासरी 46.54 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच दि.01 जून पासून दि.21 जुलै 2021 अखेर पर्यंत एकूण सरासरी 2 हजार 46.98 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली होती.


Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image