जे एन पी टी प्रशासनच्या ढिसाळ व नियोजन शुन्य कारभाराने घेतला जसखार येथे रहिवासी असलेल्या निष्पाप नागरिकाचा बळी

जे एन पी टी प्रशासनच्या ढिसाळ व नियोजन शुन्य कारभाराने घेतला जसखार येथे रहिवासी असलेल्या निष्पाप नागरिकाचा बळी





उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )
शुक्रवार दिनांक १७ जुले रोजी दुपारच्या सुमारास जे एन पी टी  कंटेनर ट्रेलर वाहनतळ (पार्किंग प्लाजा) येथे सुरक्षिततेच्या अभावा मुळे एका कंटेनर ट्रेलरने तेथे काम करीत असलेल्या बालू महादेव गुलिक या ट्रांसपोर्ट सुपरवाइजरला धड़क दिल्याने त्याचा जागेवरच मृत्यु झाला आहे.त्या पार्किंग प्लाजा येथे हजारो गाड्या मधून करोड़ो रूपये उत्पन्न मिळत आहे. करोडो रुपये उत्पन्न घेऊन देखील येथील कर्मचाऱ्यांना कोणत्याही वैद्यकीय सुविधा, सुरक्षीतता नाही. सेवा सुविधेच्या साधना अभावामुळे सदर निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. सदर  दुर्घटना शुभ लाभ ट्रांसपोर्ट च्या कंपनीने केली आहे. म्हणुन त्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला आर्थिक व भरिव सहाय्य मिळावे व त्यांना न्याय मिळावा व जे एन पी टी व तत्सम ट्रांसपोर्ट कंपनी वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठि युवा सामाजिक संस्था जसखार यांच्या वतीने मागणी करण्यात  आली आहे. सदर मृत्युमुखी व्यक्तीला न्याय मिळवून देणार असे अमित ठाकुर सदस्य -युवा सामाजिक संस्था जसखार यांनी यावेळी सांगितले.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image