१२ जून रोजी शेलघर येथे काँग्रेस तर्फे ओबीसींचे एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबीर;शेलघर येथील पत्रकार परिषदेत भानुदास माळी यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या समवेत दिली माहिती
उलवे दि १०- इतर मागासवर्गीय (ओबीसी )आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा देशभर चर्चीला जात आहे. याच विषयावर विचार मंथन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 12 जून 2022 रोजी सकाळी 9 ते सायं 7 या वेळेत रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्स, शेलघर, उलवे नोड येथे करण्यात आले आहे. या शिबिरासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री महोदय उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.