विभागीय माहिती कार्यालयाचे श्री.प्रल्हाद अभंग यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

विभागीय माहिती कार्यालयाचे श्री.प्रल्हाद अभंग यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

 



नवी मुंबई दि. 31 – कोकण विभागीय माहिती कार्यालयातील गेल्या 29 वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे रोनिओ ऑपरेटर श्री. प्रल्हाद तुळशीराम अभंग हे आज दि . 31 मे 2022 मंगळवार रोजी नियतवयोमानानूसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विभागीय माहिती कार्यालयात छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्नेह, प्रेमपूर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त रोनिओ ऑपरेटर श्री. प्रल्हाद अभंग यांचा यथोचित सत्कार आणि गौरव केला. यावेळी श्री. अभंग यांच्या पत्नी सौ. उषा अभंग, कन्या सौ. कविता पाठारे, मुलगा मयुर आणि सून नम्रता मयुर अभंग तसेच परिवारातील इतर सदस्य,  कोकण भवनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

          यावेळी श्री. अभंग म्हाणाले की, 21 जून 1993 रोजी विभागीय माहिती कार्यालयाच्या सेवेत रुजू झालो. संपूर्ण सेवाकार्यकाळात मला माझ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे माहिती खात्याला चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा माझ्या परिने प्रयत्न केला आहे. सेवानिवृत्त होत असताना मी माझ्या सेवाकाळात लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो, प्रत्येक कार्यात आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन मार्गदर्शन व अनमोल अशी केलेली मदत या बद्दल मी आपला सर्वांचा ऋणी राहीन. आपण माझ्या पुढील आयुष्यासाठी  ज्या   शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. 

          याप्रसंगी उपस्थित मान्यवर, मित्रवर्ग, सहकारी अधिकारी /कर्मचारी तसेच कुटुंबातील सदस्यांनी श्री. अभंग यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन माहिती सहायक प्रविण डोंगरदिवे यांनी केले. 

श्री. प्रल्हाद अभंग यांना सेवानिवृत्ती निमित्त कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी माहिती कार्यालयाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image