कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंंभ संपन्न

कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश  मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंंभ संपन्न 


कामोठा (प्रतिनिधी)-  सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाला बुधवार पासून सुरुवात झाली आहे. कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश  मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रयतचे मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले.

      कोरोना महामरीच्या कठीण काळानंतर आज पासून राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. त्याअंतर्गत सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, यासाठी त्यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसूम म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेचे इन्सपेक्टर रोहिदास ठाकूर, बाळासाहेब कारंडे, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे व अर्चना खाडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image