खालापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना लागणारी प्रमाणपत्रे मिळण्यासाठी तहसिलदार कार्यालयाकडून शिबिरांचे आयोजन

                                                                       

खालापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना लागणारी प्रमाणपत्रे मिळण्यासाठी तहसिलदार कार्यालयाकडून शिबिरांचे आयोजन

 

अलिबाग,दि.20 (जिमाका) :- महाराजस्व अभियानांतर्गत खालापूर तहसिल कार्यालयामार्फत  2022-23 या शैक्षणिक वर्षात सर्वसामान्य जनतेस शैक्षणिक व अन्य कामाकरिता आवश्यक असणाऱ्या विविध स्वरुपाचे दाखले व प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी जनतेच्या सोईच्या दृष्टीने तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.   

      त्यानुसार खालापूर तालुक्यातील नागरिकांना  त्यांच्याशी संबंधित दाखले मिळविण्यासाठी आवश्यक  कागदपत्रांसहित तहसील कार्यालयात अर्ज दाखल करता येतील.

      *नियोजित शिबिराची ठिकाणे व  मंडळाचे नाव पुढीलप्रमाणे :-* मंडळ अधिकारी, चौक दि.22 जून 2022  रोजी चौक, दि.29 जून 2022  रोजी, वासांबे, दि.06 जुलै 2022  रोजी, टेंभरी आदिवासीवाडी वेळ-सकाळी 10.00  वा. ते सांय. 5.00वा.  पर्यंत. मंडळ अधिकारी, खोपोली दि.23 जून 2022  रोजी, खालापूर, दि.30 जून 2022  रोजी, खोपोली, दि.07 जुलै 2022  रोजी, नावंढे, वेळ-सकाळी 10.00  वा. ते सांय. 5.00वा.  पर्यंत. मंडळ अधिकारी, वावोशी दि.24 जून 2022  रोजी, जेष्ठ नागरिक सभागृह गोरठण बु., दि.01 जुलै 2022  रोजी,चिलठण हायस्कूल चिलठण, दि.08 जुलै 2022  रोजी, ग्रामपंचायत उंबरे, वेळ-सकाळी 10.00  वा. ते सांय. 5.00वा.पर्यंत.

      याप्रमाणे मंडळनिहाय शिबिराची ठिकाणे निश्चित केली असून खालापूर तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image