“सर्वांच्या सोबतीने अनेक कामे मार्गी”- लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गव्हाण येथे प्रतिपादन

“सर्वांच्या सोबतीने अनेक कामे मार्गी”- लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गव्हाण येथे प्रतिपादन


पनवेल (प्रतिनिधी) सर्वांना सोबत घेऊन अनेक कामे मार्गी लागतात, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाण येथे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले. शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे कार्यालय गव्हाण येथे नव्याने बांधण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.

        पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीसमोर शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे कार्यालय बांधण्यात आले आहे. या कार्यालयाच्या बांधकामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्याला कामगार नेते महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, गव्हाण ग्रामपंचयतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्या योगिता भगत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, न्हावा ग्रामपंचायतीचे सदस्य सागर ठाकूर, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर प्रमोद कोळी, शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक हाडकु कोळी, अध्यक्ष अशोक कोळी, उपाध्यक्ष सचिन कोळी, सेक्रेटरी  कांचन कोळी, खजिनदार जनार्दन कोळी, यांच्यासह यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image