नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

 

नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर


अलिबाग,दि.6(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर, संबंधित नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर तसेच नोटीस बोर्डावर दि. 7 जून 2022 पासून प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे.

        सर्वोच्च न्यायालयाने दि.4 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मा. राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेश क्र. रानिआ/नप-2022/ प्र. क्र. 02/का.6, दि.22 फेब्रुवारी 2022 अन्वये जाहीर करण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाबाबत मा. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्र. रानिआ/नप-2022/प्र. क्र. 02/का.6, दि 6 मे 2022 अन्वये परि 1, 2 व 3 नुसार सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. 

     या कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या निवडणूकांकरीता प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना दि.10  मार्च 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दि. 10 मार्च 2022 पासून प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतींसह सुधारीत कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणाऱ्या आक्षेप व हरकतीवर सुनावणी देण्यात यावी, असे आदेशित केले आहे.

    संदर्भिय आदेश क्र.2 मधील परिशिष्ट-2  ("ब" वर्ग नगरपरिषदांसाठी) व परिशिष्ट 3 ("क" वर्ग नगरपरिषदांसाठी) मधील टप्पा क्र. अ.1 अन्वये दि.10 मार्च 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या नगरपरिषदांच्या प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे यांवर हरकती व सूचना दि.10 मे 2022  (मंगळवार) ते दि.14 मे 2022  (शनिवार) पर्यंत मागविणेबाबत आदेशित केलेले आहे. प्राप्त हरकतींवर दि.23 मे 2022 पर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांनी सुनावणी घेवून अभिप्रायासह अहवाल दि.30 मे 2022 पर्यंत "ब" वर्ग

नगरपरिषदांसाठी मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडे व परिशिष्ट 3 ("क" वर्ग नगरपरिषदांसाठी) मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे अंतिम मान्यतेस्तव सादर करण्याबाबत आदेशित केलेले आहे.    

      त्यानुसार अंतिम मान्यतेस्तव प्रस्ताव विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे दि.26 मे 2022 रोजी सादर करण्यात आलेले आहेत. या अहवालानुसार रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सादर करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेस व परिशिष्टांना विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडील पत्र क्र. नपा-8 / निवडणूक / रायगड/449, दि.2 जून 2022 अन्वये अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

       हे आदेश विचारत घेऊन  रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर, संबंधित नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर तसेच नोटीस बोर्डावर दि. 7 जून 2022 पासून प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे.


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image