भाजपा नगरसेवकांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर २० येथील भरवस्तीत असलेले मच्छीमार्केट सेक्टर १४ येथील राखीव असलेल्या भूखंडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय

भाजपा नगरसेवकांच्या प्रयत्नाने खारघर  सेक्टर २० येथील भरवस्तीत असलेले मच्छीमार्केट सेक्टर १४ येथील राखीव असलेल्या भूखंडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय 


खारघर  (प्रतिनिधी)- गेली काही वर्षे सेक्टर २० येथील भरवस्तीत असलेल्या मच्छिबाजाराच्या संदर्भामध्ये आजूबाजूच्या इमारतीत राहणार्‍या रहिवाश्यानकडून  अनेक तक्रारी खारघर येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात येत होत्या.भाजपाचे नगरसेवक तथा पदाधिकारी यांनी अनेक निवेदने सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिली होती.येथे मोठ्या प्रमाणात मासे व मटणाचे भाग कुजल्याने नेहमीच घाण व दुर्गंधी पसरत असते.आजूबाजूच्या  रहिवाशांना इमारतीत ये-जा करताना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.सदर बाब अनेकवेळा सिडकोच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणूनही नेहमीच चालढकल करण्यात येत होती.

               दैनंदिन मार्केट सिडको कडून पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित होताच.भारतीय जनता पार्टीतर्फे हे मार्केट इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला.पनवेल महापालिकेचे आयुक्त श्री गणेश देशमुख साहेब तसेच पनवेल महापालिकेचे सभागृहनेते माननीय श्री परेशजी ठाकूर साहेब यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत भरवस्तीत असलेले हे मच्छीमार्केट सेक्टर १४ येथील राखीव असलेल्या भूखंडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
             या संदर्भातला पाहणी दौरा माननीय श्री परेशजी ठाकूर यांनी आज केला.पहाणी दाैर्‍यात याबाबतच्या योग्य त्या सूचना सभागृहनेते मा.श्री.परेशजी ठाकूर साहेब यांनी महापालिकेचे प्रमुख अभियंते श्री. कटेकर साहेब तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत.भाजपा खारघर शहर मंडलाचे पदाधीकारी व नगरसेवक नेहमीच नागरिकांच्या अडचणी व रास्त मागणींचा आदर करित त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात.
             यावेळी खारघर शहर अध्यक्ष श्री.ब्रिजेश पटेल,स्थायी समिती सभापती श्री.नरेश ठाकूर,माजी सभापती,नगरसेवक श्री.अभिमन्यूशेठ पाटील,नगरसेवक श्री.प्रविण पाटील,नगरसेवक श्री.रामजी बेरा,युवा नेते श्री.समिरजी कदम,वार्ड अध्यक्ष श्री.वासुदेव पाटिल,पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी संजय कटेकर व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image