स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून पनवेलमध्ये सायक्लोथॉन कार्यक्रमाचे आयोजन.

स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून पनवेलमध्ये सायक्लोथॉन कार्यक्रमाचे आयोजन 



पनवेल (प्रतिनिधी)- 09 जून 2022 रोजी आयकर विभाग, पनवेल जि. रायगड या ठिकाणी भारत सरकारच्या पुढाकाराने "आझादी का अमृत महोत्सव" स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून सायक्लोथॉन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आयकर विभागातील सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचारी तसेच सनदी लेखापाल आणि रायगड विभागातील कर सल्लागार सहभागी झाले होते.श्री.अभिषेक सिंग, अतिरीक्त आयकर आयुक्त, पनवेल परिक्षेत्र यांनी कार्यक्रमाची सुरवात केली .

सकाळी 7.15 वाजता आयकर कार्यालय, पनवेल येथून या कार्यक्रमाची सुरुवात होऊन खांदेश्वर स्टेशन, मानसरोवर स्टेशन, कामोठे परिसरातील पुरातन गणेश मंदिर, ऐश्वर्या हॉटेल, अक्षय टॉवर आणि परत  आयकर कार्यालय, पनवेल असे मार्गक्रमण केले .. सायक्लोथॉन चे 10.00 किमी अंतर होते.सर्व सहभागींना प्रमाणपत्रे आणि अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image