खांदा कॉलनी सेक्टर 12 येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश

खांदा कॉलनी सेक्टर 12 येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश


नवीन पनवेल : खांदा कॉलनी, सेक्टर 12 येथील अंतर्गत रस्ते विविध कामासाठी सिडकोच्या माध्यमातून खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर त्या ठिकाणी तात्पुरते पॅचवर्क करून रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. परंतु पावसात ते पॅच निघाल्यामुळे पुन्हा खड्डे पडत असत या समस्येवर निवारण करण्यासाठी गेली काही महिने विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे हे अंतर्गत रस्ते संपूर्ण डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरावा करत होते. सिडकोच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले . यावेळी पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, शेकाप खांदा कॉलनी कार्याध्यक्ष योगेश कोठेकर, शेकापचे युवा नेते मंगेश अपराज, स्थानिक सोसायट्यांमधील पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे

         या कामात अंतर्गत रस्त्यावर संपूर्ण डांबरीकरण करून देण्यात येणार आहे अशी माहिती विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडून देण्यात आली. याप्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या सर्व सोसायटीमधील रहिवासीयांनी प्रीतम दादांनी वेळोवेळी लक्ष घालून आवश्यक तेव्हा पाण्याचे त्यांच्या संस्थेमार्फत मोफत टँकर पाणीपुरवठा, पाणीपुरवठा नियोजना संदर्भात वेळोवेळी लक्ष देणे, परिसरातील आरक्षित गार्डन प्लॉटवर स्वच्छता करून देणे, सोसायट्यांना स्वतःच्या निधीमधून कचऱ्याचे डबे देणे, व इतर कोणत्याही आवश्यक त्या वेळी मदत करणे अशा विविध समाजपयोगी कामासंदर्भात विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे आणि शेकाप नगरसेवकांचे आभार मानले


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image