पनवेलच्या अर्थसंकल्पिय विशेष सभेत विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आक्रमक

 पनवेलच्या अर्थसंकल्पिय विशेष सभेत विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आक्रमक


पनवेल : पनवेल महानगर पालिकेची अर्थसंकल्पिय सभा पनवेलच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. या वेळी आपले अर्थसंकल्पिय निवेदन सादर करताना स्थायी समिती सभापती शत्रुघ्न काकडे यांनी देशाचे पंतप्रधानगृहमंत्रीराज्याचे विरोधी पक्ष नेते आदींची नावे घेतली. परंतु रायगड जिल्हाच्या पालकमंत्री कु अदितीताई तटकरेखासदार अप्पासाहेब बारणेतसेच कोकण शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांची नावे न घेतल्याने पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे आक्रमक झाले आणि या बाबत तीव्र निषेध नोंदविला.

             त्यांच्या सोबत सर्वच विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले होते. या वेळी सभापतींना या बाबत विचारले असता त्यांनी हे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगितले. यामुळे सभागृहात गोंधळ झाला होता. स्थायी समिती सभापती हे संविधानातिक पद असून या पदावर असलेली व्यक्ती कोण्या एका पक्षाचा नसून तो संपूर्ण महानगरपालिकेचा असतो. नियमानुसार प्रथम अर्थसंकल्प हा स्थायी समितीमध्ये सादर केला जातो, त्यावेळेस तो स्थायी समिती सदस्यांना दिला जातो. नंतर तो सर्वसाधारण सभेत सादर केला जातो. सर्वसाधारण सभेअगोदर हा अर्थसंकल्प सर्व नगरसेवकाना दिला जातो जेणेकरून ते त्यावर अभ्यास करून आपली मते मांडतील. मात्र पनवेल महानगरपालिकेने तसे न करता काल 5 मे रोजी सकाळी सभे मध्ये हा अर्थसंकल्प उर्वरित नगरसेवकांना दिला. मग आम्ही या वर अभ्यास केव्हा करणार आणि आमची मते केव्हा मांडणार असे सांगत. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकनी निषेध करत सभात्याग केला.



Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image