जेष्ठ नागरिक गणेश मोरे यांचे निधन

 जेष्ठ नागरिक गणेश मोरे यांचे निधन 



पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील गुळसुंदे गावातील जेष्ठ नागरिक गणेश कानू मोरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. 
        गणेश मोरे यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते. प्रेमळ स्वभाव राहिलेले गणेश मोरे यांना आदराने 'दादा' नावाने ओळखले जात होते. ते गवंडी कामात निष्णात होते. व्यवसाय म्हणून त्यांनी शेकडो घरांची उभारणी केली आणि यामध्ये अत्यंत पारंगत असल्याने ते पंचक्रोशीत सुपरिचित होते. त्यांचे उत्तर कार्य गुळसुंदे येथे राहत्या घरी शुक्रवार दिनांक १३ मे रोजी होणार आहे. 
Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image