गावगुंडांची दहशत, हॉकी स्टिकने मारहाण; वाहन पार्किंगच्या कारणावरून पूर्वनियोजित हल्ला झाल्याचा आरोप

गावगुंडांची दहशत, हॉकी स्टिकने मारहाण; वाहन पार्किंगच्या कारणावरून पूर्वनियोजित हल्ला झाल्याचा आरोप 


पीडिताच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया झाली; मात्र ३ दिवस एफआयआर कॉपीच दिली नाही 


३०७ कलम लावण्यासाठी पीडितांची पोलीस आयुक्तांकडे धाव; खांदेश्वर पोलिसांवर नाराजी 

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन देखील पोलिसांनी चुकीची नोंद केल्याचा नातेवाईकांचा आरोप 

पनवेल : राज भंडारी

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर या सोसायटीमध्ये वाहन पार्किंगवरून सातत्याने वाद निर्माण करणाऱ्या दोघं गावगुंडांनी एका इसमावर हॉकी स्टिकच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडला... सदर प्रकार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.... मात्र यावेळी पीडित तरुणाला रुग्णालयात नेल्यानंतर या गावगुंडांनी स्वतःला मारहाण झाल्याची तक्रार देण्यासाठी खांदेश्वर पोलीस ठाणे गाठले..... 

या प्रकरणात जखमी लक्ष्मीकांत वाघमारे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नीने खांदेश्वर पोलीस ठाणे गाठले.... मात्र पोलिसांकडून सहकार्य न मिळता आपणच आरोपी असल्याची वागणूक मिळाल्याने पीडित पतीच्या पत्नीने सहाय्यक पोलीस आयुक्तांचा दरवाजा ठोठावला.... यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपल्या पोलीस ठाण्यात पीडितेच्या पत्नीला बोलावून आम्ही तपास करीत असल्याची थातुरमातुर कारणे दिली.... प्रत्यक्षात २४ मे रोजी रात्री साडे आठ वाजता पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सदरचा गुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दाखल केला जातो... गंभीररीत्या जखमी झालेल्या पीडित वाघमारे यांच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सदरची जखम ही हॉकी स्टिकने मारहाण झाल्यामुळे झाली असून हा जीवघेणा हल्ला असल्याचा लेखी दाखला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देऊन देखील पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष का केले ? असा सवाल पीडित महिलेकडून विचारला जात आहे.... 

पोलिसांकडून आणखी महत्वाची घटना म्हणजे घडलेल्या घटनेची एफआयआर कॉपी तब्बल ३ दिवसानंतर पीडितांना देण्यात आली मात्र यामध्ये फिर्याद केल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोपही या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.... अधिकाऱ्यांनी याबाबत गावगुंडांवर कारवाई का केली नाही... यासाठी पीडित कुटुंबाने शनिवारी नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाचा दरवाजा ठोठावला आहे.... पीडित महिलेच्या माहितीनुसार खांदेश्वर पोलिसांनी कलम ३२६ आणि कलम ३०७ हे गुन्ह्यातून वगळून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला असल्याचा आरोपही यावेळी केला आहे... दरम्यान जखमी पीडित लक्ष्मीकांत वाघमारे यांच्या चेहऱ्यामध्ये २ स्टीलच्या प्लेट्स बसविण्यात आल्या असून आजही येथील गावगुंड हे आमच्या पाठीमागे फिरून आम्हाला त्रास देत असल्यामुळे आमच्या जीवाला धोका असल्याचेही पोलिसांना सांगितले असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली आहे..... 

कोट 
आम्ही शांत आणि सरळमार्गी आमचा प्रपंच चालवीत असतो... मात्र याठिकाणी असणारे दोघे भाऊ पंकज भंगरे आणि प्रवीण भंगरे हे येथील रहिवाशांना वारंवार गाडी पार्किंगवरून दमदाटी करीत असतात. मंगळवारी देखील आमच्या गाडीच्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली असताना त्यांना त्या ठिकाणी कार पार्किंग करायची होती म्हणून त्यांनी वाद घालून हॉकी स्टिकच्या साहाय्याने मारहाण केली.. सदर प्रकार आम्ही पोलिसांना कळविला मात्र खांदेश्वर पोलिसांकडून सहकार्य न मिळाल्याने आम्ही सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे... तसेच याबाबत महिला आयोग यांच्याकडे तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे... तसेच आम्ही न्यायालयामध्ये याबाबत न्याय मागत आहोत.
- नीलम वाघमारे, पीडित तरुणाच्या पत्नी 
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image