महंत शिवलक्ष्मी आईसाहेब किन्नर आखाड्याचे श्रीमहंत ऋषिकेश महाराज यांच्या उपस्थितीत पनवेल मध्ये "तो मधील तीचा प्रवास" कार्यक्रम संपन्न

महंत शिवलक्ष्मी आईसाहेब किन्नर आखाड्याचे श्रीमहंत ऋषिकेश महाराज यांच्या उपस्थितीत पनवेल मध्ये "तो मधील तीचा प्रवास" कार्यक्रम संपन्न  



पनवेल (प्रतिनिधी)-पनवेल तालुका महिला पत्रकार विकास मंच,  पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्था, उम्मीद फाउंडेशन,  दुर्गा महिला प्रतिष्ठानआणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमनाने LGBTQ  तृतीयपंथी सन्मान सोहळा व फॅशन शो.चे आयोजन रविवार दि ८मे रोजी रात्री नऊ वाजता क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले

         या कार्यक्रची सुरवात महंत शिवालक्ष्मी आईसाहेब व महत ऋषिकेश नंदगिरी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावे महापौर कविता चौतमोल, प्रितम म्हात्रे राजेंद्र कोलकर जेष्ठ पत्रकार विजय कडू,भरती कडू, माधुरी गोसावी नगरसेविका प्रीती जॉर्ज,यांच्या उपस्थित होत्या

        या कार्यक्रमात शिव लक्ष्मी आईसाहेब यांनी तृतीयपंथीयांची व्यथा मांडत आम्हालाही माणूस म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले या आपल्या समाजात तृतीय पंथीयांना समजून घेत नाही आज जे कोणी तृतीयपंथी यशस्वी आहेत ती समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन शिक्षण घेऊन ते यशस्वी झाले असल्याचे त्यांनी सांगितले गरज आहे ती फक्त आपण त्यानं आपले मानण्याचे 

     या कार्यक्रम दरम्यान महिला पत्रकार अध्यक्षा सुमेधा लीम्हण यांनी महंत शिवलक्षमी आईसाहेब तसेच श्री महंत हृषिकेश महाराज आणि  विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे  ज्येष्ठ पत्रकार विजय कडू , रोहित बैसाणे, पत्रकार रुपाली शिंदे पत्रकार शंकर वायदंडे नीता माळी यांचे तसेच अनेक मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रम दरम्यान 14 तृतीय पंथीयानी  फॅशन शो मध्ये भाग घेणारांचा सन्मान करत बक्षीस देण्यात आले.तृतीयपंथीनी नेत्रदीपक स्वतःची कला सादर केली आणि कोणत्याही कामात कमी नसल्याचे दाखवून दिले. नागरिकांनी त्यांच्या या उत्साहाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला पत्रकार उपाध्यक्ष कु कोमल डांगे सचिव आदिती ढवळे सदस्य नूतन पाटील यांच्यासह प्रविण मोहकर असीम शेख,शंकर वायदंडे प्रियदर्शिनी महिला,उम्मीद फाउंडेशन पंचशील नगर रहिवाशी तसेच  सामाजिक संस्थाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.




Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image