गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघात एक ठार दोन जखमी

 गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघात एक ठार दोन जखमी 


पनवेल दि. २३ ( संजय कदम ) : एका चार चाकी गाडीचा टायर फुटून गाडीला झालेल्या अपघातात गाडीतील एक ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील पुणे - मुंबई एक्स्प्रेस लेन वर कि .मी . ९/६०० येथे सोमवारी सकाळी ५.४५ या वेळी घडली आहे .  

      पुणे बाजू कडून चालक कल्पेश सुभाष शेवाळे ( वय २७ ) हा त्याच्या ताब्यातील व्हॅगनर गाडी क्रमांक एम एच ०२ बी आर ४८७२ ही घेऊन पुणे बाजू कडून मुंबई बाजू कडे जात असताना पनवेल जवळील  पुणे - मुंबई एक्स्प्रेस लेन वर कि .मी . ९/६०० येथे त्याच्या गाडीचा  एक टायर फुटल्याने गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात गाडीत असलेला त्याचा मोठा भाऊ तेजस शेवाळे ( वय २८ ) हा जखमी होऊन मयत झाला आहे, तर तेजस याची पत्नी सोनल शेवाळे ही  व कल्पेश हे दोघे जखमी झाले आहेत . या अपघाताची नोंद पनवेल तालुका  पोलीस ठाण्यात  करण्यात आली आहे .

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image