समाजसुधारक स्व.जनार्दन आत्माराम भगत यांची ७ मे रोजी पुण्यतिथी

समाजसुधारक स्व.जनार्दन आत्माराम भगत यांची ७ मे रोजी पुण्यतिथी 

  

पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांचा ३४ वा पुण्यतिथी कार्यक्रम शनिवार, दिनांक ०७ मे रोजी सकाळी ११. ३० वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे. 
         जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजामध्ये रूजवली. त्यांच्या नावाने व आशिर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. त्या अनुषंगाने शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उप कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, कार्यकारी मंडळ सदस्य नगरसेवक अनिल भगत, प्रकाश भगत, हरिश्चंद्र पाटील, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत, सदस्या वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, सदस्य वसंत पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image