महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त 'उत्सव महाराष्ट्राचा संस्कृती महाराष्ट्राची' कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त 'उत्सव महाराष्ट्राचा संस्कृती महाराष्ट्राची' कार्यक्रम संपन्न 



पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नावडे शहर व मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने 'उत्सव महाराष्ट्राचा संस्कृती महाराष्ट्राची' हा बहरदार संगीतमय कार्यक्रम तसेच विशेष सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला.  हा सोहळा नावडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
         या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक हरेश केणी, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, जिल्हा सदस्य पवन भोईर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर ठाकूर, जेष्ठ नेते रवींद्र खानावकर, नावडे शहर अध्यक्ष मदन खानावकर, उत्तर रायगड युवा मोर्चा अध्यक्ष मयूरेश नेतकर, पडघेचे माजी सरपंच कृष्णा पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश खानावकर, जितेंद्र काटकर, युवा नेता महेश पाटील, शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा समालोचक अध्यक्ष संदीप पाटील, रवींद्र भोईर, मुख्याध्यापक बबन काटकर, संदीप मोर, सचिन पाटील, ठाणे महानगर पालिका उपअभियंता अविनाश आव्हाड, युवा नेता मुकेश बाळूंग, डॉ. सुमन मिश्रा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image