मृद व जलसंधारण विभागाची रायगड जिल्ह्यात चार उपविभागीय कार्यालय तर अलिबाग येथे मुख्यालय सुरु होणार

 

मृद व जलसंधारण विभागाची रायगड जिल्ह्यात चार उपविभागीय कार्यालय तर अलिबाग येथे मुख्यालय सुरु होणार

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या मागणीला यश


अलिबाग,दि.28 (जिमाका) - मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा जलसंधारण अधिकारी व उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये नव्याने कार्यान्वित करणे व सर्व उपविभागीय कार्यालयांचे तालुका कार्यक्षेत्र घोषित करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालय कार्यान्वित करण्यात आले असून या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील उपविभागीय क्षेत्रातील माणगाव, कर्जत, कोलाड, अलिबाग या चार जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती करण्याचा निर्णय शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने घेतला आहे. याबाबत रायगड पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी मृद व जलसंधारण मंत्री यांच्याकडे मागणी करीत पाठपुरावा केला होता. 

        विभागाच्या राज्यस्तर यंत्रणेकडील कामकाजाची व्यापकता व यंत्रणेवरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने राज्यस्तर यंत्रणेकडील जिल्हा कार्यालये आणि उपविभागीय कार्यालये यांची संख्या काही प्रमाणात वाढ केल्यास राज्यस्तर यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा यांचा समतोल साधला जाऊन मनुष्यबळाचा योग्य वापर होण्यास मदत होणार आहे. 

     या नवीन रचनेमुळे जलसंधारण विभागाचे रायगड जिल्ह्यातील कामकाज गतिमान होणार आहे.


Popular posts
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image