रायगड जिल्हा पोलीस व स्वदेस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पोलीस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम संपन्न

                                                                                     

रायगड जिल्हा पोलीस व स्वदेस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पोलीस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम संपन्न

     अलिबाग, दि.10 (जिमाका):- रायगड जिल्हा पोलीस व स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत कृषी विभाग, डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना या विषयावर झूम मीटिंगच्या माध्यमामधून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले व माणगाव तालुका कृषी अधिकारी रवींद्र पवार यांनी मार्गदर्शन केले.

     यावेळी स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

     पोलीस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार असून त्यामध्ये शासकीय योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम व विविध विषयांवर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने व पोलीस निरीक्षक श्री.केरूभाऊ कोल्हे यांच्या सहकार्याने व स्वदेस फाउंडेशन यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.



Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image