टाटा नेक्साॅन मॅक्स इलेक्ट्रीक कारचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण ;एका चार्ज मध्ये 437 किमी धावणार गाडी

टाटा नेक्साॅन मॅक्स इलेक्ट्रीक कारचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण ;एका चार्ज मध्ये 437 किमी धावणार गाडी 


  पनवेल/ प्रतिनिधी:भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शहरातील टाटा मोटर्स शोरूममध्ये नेस्कॉन ईव्ही मॅक्स ही ईलेक्ट्रिक कारचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी नगरसेवक अनिल भगत, माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्यासह टाटा मोटर्सची इंजिनिअर कमिटी उपस्थित होती. सदर इलेक्ट्रिक कार ही एका चार्ज मध्ये 437 की.मी चालते आणि सदर कारची बेसिक किंमत ही 17 लाख 74 हजार एवढी आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे हेरिटेज मोटर्स पनवेल मधील सरव्यवस्थापक सचिन सावंत,विक्री व्यवस्थापक सचिन महाजन ,विक्री व्यवस्थापक निपून सिन्हा आणि सर्व हेरिटेज मोटर्स परिवाराने केले होते.



Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image