दुबई पोर्ट (DPW) व सिंगापूर (PSA) पोर्ट विरोधात लंडन मध्ये निदर्शने-कामगार नेते महेंद्र घरत यांनी मांडल्या भारतीय कामगारांच्या समस्या

 दुबई पोर्ट (DPW) व सिंगापूर (PSA) पोर्ट विरोधात लंडन मध्ये निदर्शने-कामगार नेते महेंद्र घरत यांनी मांडल्या भारतीय कामगारांच्या समस्या




           दुबई पोर्ट (DPW) व सिंगापूर (PSA) या परदेशी कंपन्या भारतात आपले प्रकल्प उभारतात परंतु येथील कामगारांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. कामगारांना वेतन कमी दिला जातोकामगारांच्या सुरक्षा व आरोग्य यांना प्राधान्य दिला जात नाहीकामगारांचा मानसिक छळ केला जातोमहिला कामगारांना नाईट शिफ्ट दिली जातेजर कामगारांनी आपल्या हक्कांसाठी संघटना केली तर त्यास मुद्दामहून व्यवस्थापन मान्यता देत नाही. जे कामगार संघटना करण्यासाठी पुढाकार घेतात त्यांना तडकाफडकी कामावरून काढले जातात. त्यामुळे कंपन्यांविरोधात कामगारांमध्ये रोश आहे. या कंपन्यांविरोधात भारतातच नव्हे तर संपूर्ण जागतिक पातळीवरइंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन  या बहुराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून लंडन येथे निदर्शने करण्यात आली. दिनांक २० ते २२ एप्रिल २०२२ रोजी लंडन येथे या कंपन्यांतील कामगारांच्या समस्यांसंदर्भात जागतिक पातळीवर चर्चा करण्यात आली. न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा ITF लंडन या बहुराष्ट्रीय संघाचे लॉजिस्टीक्स विभागाचे व्हा. चेअरमनकामगार नेते महेंद्र घरत यांनी भारतीय संघटनांचे प्रतिनिधित्व केले व भारतीय कामगारांचे प्रश्न जगासमोर मांडले.  

           कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने जागतिक पातळीवर ITF या संघावर आपले स्थान निर्माण करून उरण – पनवेल नवी मुंबईरायगड मधील लॉजिस्टीक्स (CFS) मधील कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करत आहेत.  


Popular posts
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image