मोफत सोलर मोबाईल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण

 मोफत सोलर मोबाईल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण




नवीन पनवेल : गुढीपाडव्याचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीसनगरसेवक गणेश कडू यांच्या संकल्पनेतून सेक्टर १५, नवीन पनवेल बस स्थानक येथे मोफत सोलर मोबाईल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते पार पडले. एक अत्याधुनिक अशी ही संकल्पना ज्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

              शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्या संकल्पनेतून स्व. चंद्रकांत मारुती कडू यांच्या स्मरणार्थ मोफत सोलर मोबाईल चार्जिंगची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. नवीन पनवेल सेक्टर १५एमईसीबी आँफिसजवळील सिद्धीविनायक सोशल संस्था बस स्थानक आणि स्व. पंढरीनाथ सदाशिव आरु यांच्या स्मरणार्थ नवीन पनवेल येथील हाँटेल नीलकमल समोर मोफत सोलर मोबाईल चार्जिंग सेवा नवीन पनवेल परिसरातील गरजू नागरिकांसाठी सुरु करण्यात आली. यावेळी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुखडॉक्टर गिरीष गुणेमाजी आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रेमहाविकास आघाडी पनवेलचे अध्यक्ष बबन पाटीलकाँग्रेस जिल्हाध्यक्ष आर सी घरतराष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष सतीश पाटीलनारायण घरतकाशीनाथ पाटीलविरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, देवेंद्र पाटिल, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष अनिल नाईक तसेच महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका पनवेल व शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





--

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image