नवीन पनवेलमध्ये सोमवारी नवीन पाईप लाईनचे उदघाटन

नवीन पनवेलमध्ये सोमवारी नवीन पाईप लाईनचे उदघाटन 


पनवेल(प्रतिनिधी) नवीन पनवेल सेक्टर १३ मधील ए टाईप चाल क्रमांक ४, १५, ३३, ४० आणि ४१ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या नवीन पाईप लाईनचे काम भाजपच्या नगरसेविका सुशिला जगदीश घरत यांनी स्वखर्चातून केले असून या कामाचे उदघाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवार दिनांक ०४ एप्रिलला रात्री ०८ वाजता करण्यात येणार आहे. 
             या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष सुनिल घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, नगरसेविका वृषाली वाघमारे, ज्येष्ठ कार्यकर्ते सी. सी. भगत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेवक के. डी. म्हात्रे, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, रवींद्र भगत आदी उपस्थित राहणार आहेत. 

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image