खारघर-कोपरा परिसरात अवैध दारू विक्री जोरात

 खारघर-कोपरा परिसरात अवैध दारू विक्री जोरात

नवीन पनवेल : दारूमुक्त असलेले खारघर शहर आता दारू युक्त म्हणून ओळखु लागलेले आहे. खारघर-कोपरा परिसरात अवैध पद्धतीने जोरात दारू विक्री केली जात आहे. कोपरागाव, खारघर गाव, मूर्बीगाव, रांजनपाडा गाव, पेठगाव या सर्व गावामध्ये ठीकठिकाणी बिंधास्तपणे दारू विक्री होत आहे. मात्र यावर कारवाई केली जात नाही. 

             कोपरा गावात सर्वात जास्त गावठी दारू विक्री धंदे जोरात चालत आहे. यावर कोणाचा वरदहस्त आहे हे गुलदस्त्यात आहे. खारघरमध्ये फुटपाथवर राहणारे भिकारी सर्वात जास्त प्रमाणात असल्याने हे भिकारी, गर्दूल्ले दारू पिण्याकरता कोपरा गावात येत असतात. व दारू पिऊन रस्त्यावर कुठे ही पडतात. याकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीसाँचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहेदारू विक्रेत्यांचे नाव पोलीसांकडे दिले तर आपले नाव उघड होईल या भीतीने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहे. या अवैध धंद्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असून या अवैध धंद्यांवर कारवाई करुन आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. खारघर-कोपरा परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे. रात्रीच्या वेळी तळीराम बिंधास्त कुठेही बसून दारू पिण्याचा आनंद घेत आहे. सर्वांच्या नजरेस पडणारे या अवैध धंद्यांकडे पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. या बेकायदेशिर दारू विक्रीवर कोणतीही मोठी कारवाई काही महिन्यापासून झालेली नाही. अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याने खारघर शहरात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. परंतु याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. 

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image