नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आणि ई श्रम कार्ड अभियान; आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती

नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आणि ई श्रम कार्ड अभियान; आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती 




पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर तसेच मोफत ई श्रम महानोंदणी अभियान आणि ई श्रम कार्ड वाटप तक्का गाव येथे आयोजित करण्यात आले होते.
           या उपक्रमाचे उदघाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, तेजस कांडपीळे, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, रुचिता लोंढे, भाजपचे कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, युवा नेते प्रतिक बहिरा, अमन अख्तर, किरण बहिरा, जितू खुटकर, प्रशांत बहिरा, तुषार बहिरा, श्रेयस बहिरा, राम सागर, संदेश घरत, प्रमोद बहिरा, भारत बहिरा, किरण बहिरा, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  
         यावेळी उपस्थितांनी नगरसेवक अजय बहिरा यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. यावेळी कच्छ युवक संघ पनवेल व नगरसेवक अजय बहिरा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शिबिरात ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच ७० लाभार्थ्यांना ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले तसेच १९० जणांची ई श्रम कार्डसाठी नोंदणी झाली.

 
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image