संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ४९ प्रकरने मंजूर

 संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ४९ प्रकरने मंजूर


नवीन पनवेल : पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक २० एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नवनियुक्त समितीचे अध्यक्ष दर्शन ठाकूर व सदस्य तसेच शासकीय सदस्य यांचे प्रशासनाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

           विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजनाश्रावण बाळ सेवा राज्य योजनाकेंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य इ. योजनाबाबत एकनाथ नाईकनायब तहसीलदारतथा आहरण व संवितरण अधिकारीसंजय गांधी योजना यांनी माहिती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष दर्शन ठाकूर व सदस्य तसेच शासकीय सदस्य सचिव तथा तहसिलदार पनवेलशासकिय सदस्यसंजय भोयेगटविकास अधिकारीपंचायत समिती पनवेलयांच्या उपस्थितीत समितीची बैठक होऊनसंजय गांधी निराधार योजनाराष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना इ. लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजूरी देण्यात आलेली आहे.

       संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ४९ प्रकरने मंजूर करण्यात आली तर केंद्र पुरस्कृतराष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत एकूण ४ प्रकरने मंजूर करण्यात आली. वरील प्रकरणात दर प्रति महिना रक्कम रु. १ हजार  ते १ हजार २०० मिळून एकूण रक्कम रु. ५२ हजार ४०० तसेच केंद्र पुरस्कृतराष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना एकूण ४ प्रकरणे ८० हजार असे एकूण १ लाख ३२ हजार ४०० इतके अनुदान लाभार्थ्यांना वाटप करणेसाठी बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image