सायन-पनवेल महामार्गावरील झाडांची कत्तल करणाऱ्या फलक मालकावरती कारवाई करा;अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू-विजय मयेकर

सायन-पनवेल महामार्गावरील झाडांची कत्तल करणाऱ्या फलक मालकावरती कारवाई करा;अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू-विजय मयेकर      


                                             

खारघर (प्रतिनिधी)-सायन-पनवेल महामार्गावरती कोपरा गांव ते घरकुल-स्पॕघेटी बस थांब्यापर्यंत शासन दरवर्षी सामान्य जनतेच्या करामधील लाखो रूपये खर्चून झाडे लावीत असते;पण ती झाडे जरा मोठी झाली की,या परिसरातील होर्डींगवाले आपले होर्डींग दीसत नाही म्हणून झाडांची सरसकट कत्तल करीत आहेत.या बाबीकडे शासनातील बडे अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष्य करीत आहेत.त्यामुळे हे होर्डींगवाले ही कत्तल करायला धजावत आहेत.अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष विजय मयेकर यांनी केली आहे.सदर निवेदनाच्या प्रती संबंधित विभाग आणि प्राधिकरणाबरोबरच पर्यावरण मंत्री,पालक मंत्री व नगर विकास मंत्री यांना सुद्धा दील्याचे त्यांनी सांगीतले.                                  सदर झाडांची वरचेवर कत्तल करणाऱ्या होर्डींगवाल्यानवरती योग्य ती कडक आणि कायदेशीर कारवाई न केल्यास आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने परिसरातील निसर्गप्रेमी नागरिकांना बरोबर घेऊन सायन-पनवेल महामार्गावरती रास्ता-रोको आंदोलन करू.असा ईशारा विजय मयेकर यांनी,"जनसभा"च्या प्रतिनिधीजवळ बोलताना दीला.

Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image