पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा - भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा - भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी 



पनवेल(प्रतिनिधी) राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट'  कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. 
          महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजी वरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे हे दुर्दैवी आहे. गेली दीड वर्षे पेट्रोल , डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे . मात्र या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले आहे. केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २१ रोजी पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ व १० रुपयांची कपात केली. त्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यांसह एकूण २५ राज्य सरकारांनी पेट्रोल डीझेल वरील मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला दिलासा दिला. मात्र महाराष्ट्र सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट अजूनही कमी केलेला नाही. पेट्रोल, डिझेल जीएसटी च्या कक्षेत आणण्यासही महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. आता तरी आघाडी सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image