अस्सल मराठमोळी सौंदर्य स्पर्धा 'माझी मराठी माझी अस्मिता' उत्साहात संपन्न

अस्सल मराठमोळी सौंदर्य स्पर्धा 'माझी मराठी माझी अस्मिता' उत्साहात संपन्न



पनवेल (रायगड ) परिणीता सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, खारघर सेक्टर 12 मध्ये असलेल्या एम.टी.डी.सी. हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. परिणीता सोशल फाउंडेशन अर्थात परिणीता परिवाराच्या अधिकृत सदस्यांच्या विविध वस्तूंचे, व्यवसायांचे प्रदर्शन आणि विक्री तसेच अस्सल मराठमोळी सौंदर्य स्पर्धा माझी मराठी माझी अस्मिता अशा दोन मोठ्या कार्यक्रमांचा यात समावेश होता. 

    रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन खारघर नवी मुंबईतील प्रसिद्ध समाजसेवक रामजी बेरा, प्रवीण पाटील, ब्रिजेश पटेल, खारघर पोलिस स्टेशनच्या पी.आय.विमल बिडवे, परिणीता सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी प्रशांत सागवेकर, संस्थापक प्रशांत सागवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यानंतर परिणीता एक्स्पोला सुरूवात झाली. या प्रदर्शनात परिणीता परिवाराच्या ३५ परिणीतांनी आपल्या विविध व्यवसायांचे स्टॉल्स लावले होते.

     संध्याकाळी परिणीता परिवाराच्या सदस्या मैत्रिणींचा सहभाग असलेली अस्सल मराठमोळी सौंदर्य स्पर्धा माझी मराठी माझी अस्मिता सुरू झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन खारघर येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या स्पर्धेच्या परिक्षक डिजिटल डिटॉक्स चळवळीच्या प्रणेत्या डॉ.रेखा चौधरी, २०२१च्या मिसेस इंडिया हर्षला तांबोळी, बॉलीवूड फोटोग्राफर श्रद्धा वर्तक आणि खारघर मधील निसाम फॅशन डिझायनिंग अकॅडमीच्या संचालिका नीरू जैन, परिणीताचे संस्थापक प्रशांत सागवेकर आणि साक्षी सागवेकर इ. मान्यवर उपस्थित होते. 

     उद्घाटन कार्यक्रमानंतर स्पर्धा सुरू झाली. अत्यंत चुरशीची अशी लढत या स्पर्धेत पहायला मिळाली या स्पर्धेत विजेते पदाचा मान, प्रा.स्वाती पाटील यांनी पटकावला तर प्रा. प्रियंका ठाकूर आणि चंदिगड पंजाब येथे परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या माधवी राणे चिखले यांनी तृतीया क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थसाठी सविता कुलकर्णी आणि सोनल पोवार यांची निवड करण्यात आली. तर बेस्ट स्माईलचा पुरस्कार सोनल पोवार, बेस्ट कॉश्चुम शीतल नाईक आणि बेस्ट पर्सनॅलिटी स्तुती मुंतोडे यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेला खारघर, कामोठे, पनवेल येथील प्रसिद्ध समाजसेवक सचिन वासकर आणि आर्किटेक्ट संदीप चव्हाण यांचे सहकार्य लाभले. भविष्यात अशा स्पर्धा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी परिणीताच्या संस्थापिका साक्षी प्रशांत सागवेकर यांनी म्हटले.

     याच कार्यक्रमात महिलांसाठी काम करणाऱ्या महिलांचा परिणीता सखी सन्मान देऊन गौरव करण्यात आला यामध्ये उलवे नवी मुंबईतील रेखा चिरनेरकर, ऐरोली नवी मुंबईतील पल्लवी नाईक निंबाळकर आणि पनवेल येथील स्मिता जोशी यांचा समावेश होता. 

    या कार्यक्रमाला खारघर, कामोठे, नवी मुंबई, ठाणे, वाशी, नेरूळ, ऐरोली, घणसोली अशा परिसरातील परिणीता सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image