शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या प्रयत्नातून वडाळे तलाव येथे सुरक्षा रक्षक तैनात

शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या प्रयत्नातून वडाळे तलाव येथे सुरक्षा रक्षक तैनात


पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वडाळे तलावाचे महानगपालिकेतर्फे सुंदर असे सुशोभीकरण करून पनवेलचा वारसा व संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्र.क्र.18 मधील शेकाप नगरसेवक देखील वडाळे तलावाच्या कामाची वारंवार पाहणी करून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सतत प्रयत्नशील असतात. शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या प्रयत्नातून वडाळे तलाव येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. 

              शेकापच्या नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकार यांच्याकडे अनेक पक्षीप्रेमी,छायाचित्रकार, चालण्याकरीता येणाऱ्या नागरिकांची,जेष्ठ नागरिक,सतत तक्रारी करीत असतात. वॉकिंग ट्रॅकवरून दुचाकी चालविणे,युगल उपद्रवात्मक कृत्य करीत असतात. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे तीन शिफ्ट मध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्याची गरज असल्याची सूचना व विनंती नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांनी वारंवार प्रशासनाकडे केली. सरतेशेवटी आयुक्त गणेश देशमुख,अति. आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी याची गांभिर्यता लक्षात घेऊन तातडीने वडाळे तलाव येथे तीन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. यामुळे तलावाकडे चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच सुरक्षा व सुशोभीकरण जतन होण्यास हातभार लागेल.यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत हे देखील प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामुळे ट्रॅकवर चालण्याकरीता येणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षेचे व आनंदाचे वातावरण असून त्यांनी डॉ.  सुरेखा विलास मोहोकर यांच्या कार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले आहे.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image