सकापूर येथे 62 वर्षीय ईसमाने केली आत्महत्या, तिघांविरोधात गुन्हा

 सकापूर येथे 62 वर्षीय ईसमाने केली आत्महत्या, तिघांविरोधात गुन्हा

नवीन पनवेल: सुकापुर येथे 62 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय धोंडू पवार असे मृत इसमाचे नाव आहे.
          
         सुकापूर येथे न्यू प्रेरणा सोसायटी येथे राहणारे विजय पवार यांच्या सुनबाई अर्पिता हिने ओळखीचा महिलांनी सामुहिक निर्माण केलेल्या मुस्कान ग्रुप या नावाने ग्रेटर बँक खारघर येथून तीन लाखाचे ग्रुप लोन घेतले होते. यातील काही हप्ते थकले होते. हे लोन वसूल करण्यासाठी बँकेतुन महिला आल्या होत्या.
लोनचे हप्ते व लोन भरा नाहीतर तुमच्या घरातील सर्व सामान जप्त करून पोलिसांना बोलवुन तुम्हाला आत मध्ये टाकू असे धमकावल्यामुळे सुकापूर येथील 62 वर्षीय विजय धोंडू पवार यांनी मानसिक तणावाखाली गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात वैशाली, स्नेहल आणि ग्रेटर बॉम्बे बँकेच्या खारघर येथील संबंधित अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

--


Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image