डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंती महोत्सावानिमित्त-भीम गीतांनी आदरांजली-आनंद शिंदे यांच्या स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंती महोत्सावानिमित्त-भीम गीतांनी आदरांजली-आनंद शिंदे यांच्या स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन


नवी मुंबई दि.13:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती महोत्सावानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत *दि. 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.00 वा. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभगृहात* प्रसिद्ध गायक श्री.आनंद शिंदे यांच्या स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      या कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री धनयंजय मुंडे,  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील,  वस्त्रोद्योग मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा  मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख,  सहकार, कृषि, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, खासदार शरद पवार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे (भाप्रसे), डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त राज्यभर दि. 6 ते 16 एप्रिल 2022 या दरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळया दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगणारी चित्रफित प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती मधील उद्योजकांना देण्यात येणाऱ्या मार्जिन मनी योजने अंतर्गत युवा उद्योजक, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या राजर्षी श्री शाहू महाराज शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची यशोगाथा असलेली माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी होणार आहे.

      सामाजिक न्याय विभागा मार्फत प्रथमच सुरु केलेल्या महाविद्यालयातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी Equal Opporunity Centre समान संधी केंद्र संकल्पना यांचे प्राथमिक स्वरुपात उदघाटन देखील यावेळी केले जाणार आहे. अशी माहिती मुंबई विभागाच्या  समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.


Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image