11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी,पालकांकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यपध्दतीबाबत ऑन लाईन प्रशिक्षणाचे आयोजन

11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी,पालकांकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यपध्दतीबाबत ऑन लाईन प्रशिक्षणाचे आयोजन


 नवी मुंबई दि. 12:-  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने दि. 13 एप्रिल रोजी दुपारी 2.00 वाजता जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यपध्दतीबाबत ऑन लाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

      राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल या कालावधीत "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त  सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  त्याअनुषंगाने  कोकण विभागातही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, पालक व संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य  व संबंधित कर्मचारी यांच्या करिता जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यपध्दतीबाबत Zoom ॲप व्दारे ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर क्लीकचा वापर करावा.

https://us05web.zoom.us/j/82194285501?pwd=aU96bDNrcm1IK0srMzZ5N2hINXR0Zz09                  मिटिंग आयडी -82194285501           पासवर्ड – 15GT9f

इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, पालक व संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य  व संबंधित कर्मचारी यांनी मोठया संख्येने  या ऑनलाईन  कार्यशाळेस उपस्थित राहून जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यपध्दती समजून घ्यावी असे आवाहन ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपयुक्त तथा सदस्य श्री. वासुदेव पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image