श्रीगांव येथे उत्साहात शिवजयंती साजरी

 श्रीगांव येथे उत्साहात शिवजयंती साजरी


पोयनाड(सचिन पाटील)-अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे श्रीगाव ग्रामस्थ यांच्यावतीने मरिदेवी मंदीरात शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवरायांच्या मुर्तीची स्थापना केल्यानंतर शिवाजी महाराजांची पालखी मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत असंख्य शिवभक्त सामिल होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत होते‌.

        शिवजयंतीच्या या कार्यक्रमात गावांतील सर्व अबाल-वृद्ध आणि महिला उपस्थित होत्या.सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे भरते आले होते."जय भवानी-जय शिवाजी"च्या घोषणांनी संपूर्ण गावाचा परिसर दुमदुमून गेला होता."एक गाव-एक शिवजयंती" या अलिखित नियमांनुसार गावातील सर्वपक्षिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी शीवछत्राखाली एकत्र आले होते.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image