६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ठाणे केंद्रातून; "तहान" प्रथम-श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ संस्थेच्या 'तुंबई' या नाटकाला तृतीय पारितोषिक

 ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ठाणे केंद्रातून; "तहान" प्रथम-श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ संस्थेच्या 'तुंबई' या नाटकाला तृतीय पारितोषिक


मुंबई(प्रतिनिधी) ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून श्री स्थानक संस्था, ठाणे या संस्थेच्या तहान या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच श्री जरी मरी सेवा ट्रस्ट, वसई या संस्थेच्या नात्याची गोष्ट या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. 

      या स्पर्धेत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या संस्थेच्या तुंबई या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक विजय पाटील (नाटक- तहान), द्वितीय पारितोषिक निलेश गोपनारायण (नाटक- नात्याची गोष्ट), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक सिध्देश (नाटक- तहान), द्वितीय पारितोषिक सौरभ शेठ (नाटक अंधे जहाँ के अंधे रास्तें), नेपथ्य प्रथम पारितोषिक विशाल भालेकर (नाटक-तहान), द्वितीय पारितोषिक विजय कोळवणकर (नाटक- एक वजा क्षण), रंगभूषा प्रथम पारितोषिक रमेश झोरे (नाटक- सावधगीर), द्वितीय पारितोषिक स्नेहशील गणवीर (नाटक- मरी आईचा गाडा), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक अनुष्का बोन्हऱ्हाडे (नाटक- तहान) व निलेश गोपनारायण (नाटक- नात्याची गोष्ट), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे वेदश्री तांबोळी (नाटक-एक वजा क्षण), गौरी जाधव (नाटक- सारं कसं डेंजर डेंजर), गौरांगी पाटील (नाटक- सावधगीर), शरयू कांबळे (नाटक-राधी), सोनल तानवडे (नाटक-रडीचा डाव), आशिष सोहोनी (नाटक- एक वजा क्षण), सागर राणे (नाटक- मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे), शुभम कोल्हे (नाटक- मरीआईचा गाडा), अजय सरदार (नाटक- तू भ्रमत आहसी), गौरव पाटील (नाटक- एंड गेम).

      दि. २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२२ या डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाटयगृह, ठाणे येथे •अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. देवेंद्र यादव, श्री. नंदकुमार पाटील आणि श्रीमती माणसी राणे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.



Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image