महापारेषणची नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरणाचा समतोल राखणारी असावी- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

वाशी परिमंडळाच्या ऐरोलीतील नियोजित प्रशासकीय इमारतीचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 

महापारेषणची नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरणाचा समतोल राखणारी असावी- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत


ठाणे, दि. 2 (जिमाका) : सध्या विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे योग्य वितरण करण्यासाठी राज्याची पारेषण यंत्रणा सक्षम आहे. महापारेषणच्या नियोजित इमारतीमध्ये वाशी परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालये एकाच छताखाली येणार असल्यामुळे महापारेषणचे व्यवस्थापन व समन्वय राखण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण समतोल राखण्यासाठी या इमारतीच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौरऊर्जेची यंत्रणा उभारावी, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

            ऐरोली संकुलातील महापारेषणच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधारी कंपनीचे मुख्य सल्लागार उत्तमराव झाल्टे, संचालक (संचलन) अनिल कोलप, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, मुख्य अभियंता (स्थापत्य) भूषण बल्लाळ, अधीक्षक अभियंता पीयूष शर्मा, मोहन ननवरे उपस्थित होते.

            ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले,``तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर वाशी परिमंडळाचे कार्यालय अपुऱ्या जागेत कार्यान्वित झाले होते. इतर कार्यालयेही ऐरोली संकुलात आहेत. महापारेषणची उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी एकाच छताखाली सर्व कार्यालये होणार आहेत, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थापनाचा खर्च कमी होईल. तसेच अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढेल. संरक्षक भिंत व सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी. अग्निसुरक्षा व अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुसज्ज वसाहत, क्लब हाऊस, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटनसाठी क्रीडांगण, योगा कक्ष, वाचनकक्ष, आधुनिक ग्रंथालय, आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, जैवविविधतेच्या दृष्टीने उद्याने, शेततळे, जॉगिंग ट्रॅक करावेत.`` 

            याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रातिनिधीक अडचणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऐकून घेतल्या. तसेच त्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

            प्रास्ताविकात संचालक (संचलन) श्री. कोलप म्हणाले, ``राज्य भार प्रेषण केंद्र वाशी परिमंडळातील 22 विभागीय कार्यालये एकाच ठिकाणी येणार आहेत. सर्व विभागीय कार्यालये सर्वसुविधायुक्त व पर्यावरणपूरक होणार आहेत. रूफटॉप, रेन वॉटर हार्वेस्टिंग व नैसर्गिक प्रकाश मिळण्यासाठीची व्यवस्था यामध्ये असणार आहे.``

            प्रारंभी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे स्वागत महापारेषणचे संचालक (संचलन) श्री. कोलप यांनी केला. महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधारी कंपनीचे सल्लागार श्री. उत्तमराव झाल्टे यांचा सत्कार संचालक (प्रकल्प) श्री. नसीर कादरी यांनी केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी बाविस्कर यांनी केले. मुख्य अभियंता (स्थापत्य) श्री. बल्लाळ यांनी आभार मानले.


Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image