सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी अजिंक्य रोहेकर 'रायगड भूषण' पुरस्काराने सन्मानित

सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी अजिंक्य रोहेकर 'रायगड भूषण' पुरस्काराने सन्मानित 


पनवेल(प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल अजिंक्य बाळाराम रोहेकर यांना रायगड जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या  रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

         अलिबाग येथे झालेल्या समारंभात रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती निलीमा पाटील, तसेच अजिंक्य यांच्या आई व आरे बुद्रुकच्या केंद्रप्रमुख विद्या रोहेकर आणि कुटुंबीय, आदर्श शिक्षक ब्रिजेश भादेकर उपस्थित होते. 

      अजिंक्य रोहेकर पदवीधर असून त्यांनी आपली आई विद्या रोहेकर यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे अखंडपणे सुरु ठेवला आहे. आईच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांनी विद्यालयीन शिक्षणापासून समाजसेवेत स्वतःला झोकून दिले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत एक चांगला पायंडा पाडला. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने अजिंक्य रोहेकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रायगड भूषण पुरस्काराने सन्मान केला. त्याबद्दल रोहेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image