जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा संपन्न

 जिल्हा  बुद्धिबळ निवड स्पर्धा संपन्न


पनवेल/विजयकुमार जंगम

रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने  आणि पनवेल चेस असोसिएशनच्या  वतीने रायगड जिल्हातील आठ/बारा वर्षाखालील बुद्धिबळ संघाची निवड करण्यासाठी दिनांक १०/०३ /२०२२ रोजी स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेसाठी पनवेल,उरण,पेण,खोपोली,कर्जत तालुक्यातील  सदतीस  स्पर्धकांनी  सहभाग नोंदविला. इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल , कामोठ्याच्या वातानुकूलीत हॉल मध्ये मुलांनी स्पर्धेचा आनंद घेतला.

स्पर्धेच्या उद्घाटन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे,रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष आल्हाद पाटील  यांच्या हस्ते झाले . उद्घाटनप्रसंगी  पनवेल चेस असोसियशनचे अध्यक्ष गंभीर दांडेकर , सचिव सी.एन .पाटील ,सद्स्य  अॅडव्होकेट राजेश  खंडागळे, इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलचे  फाऊंडर डॉ. अजय श्रीवास्तव ,ममता मॅडम ,किरण प्रधान ,नेहा सिंग,स्पोर्ट्सचे प्रशांत यादव सर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी  डॉ. अजय श्रीवास्तव यांनी मनोगत व्यक्त करताना रायगड जिल्हा व पनवेल चेस असोसियशनचे  मुलांना खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद दिले तसेच नियमीत असे उपक्रम शाळेत राबवू असे आश्वासन दिले. विलास म्हात्रे यांनी लवकरच  “चेस इन स्कूल ’’रायगडमध्ये सुरू करून लहान मुलांमध्ये  बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

           निवड झालेली आठ वर्षाखालील गटातील दोन  मुले/मुली पुणे येथे १२ व १३ मार्च रोजी होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तर बारा वर्षाखालील गटातील दोन  मुले/मुली नागपुर  येथे १९ व २० मार्च रोजी होणार्‍या राज्यस्तरीय  स्पर्धेसाठी रायगडचे प्रतिनिधित्व करतील.स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात,उत्साहात  चुरसपूर्ण झाल्या ,परीक्षा सुरू असूनसुद्धा  पालकांनी आपल्या पाल्यांना स्पर्धेसाठी आणल्याबद्दल सचिव सी. एन . पाटील यांनी कौतुक करून आभार मानले.

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच अमित कदम ,संगणकाचे काम  श्रेयस  पाटील  राष्ट्रीय पंच  तसेच श्रेया पाटील व चंद्रशेखर पाटील यांनी  पंच म्हणून काम पहिले.

स्पर्धेचा निकाल  :-

आठ वर्षाखालील मुलांच्या  गटात आरव राज-पनवेल (प्रथम),अद्वय ढेणे-पनवेल  (द्वितीय ),आर . मुकील (तृतीय ) रेयान सिंग (चतुर्थ ).

आठ वर्षाखालील मुलींच्या गटात आरोही पाटील -उरण  (प्रथम ) ,स्मिती शेडगे -उरण (द्वितीय ).सानवी कुर्बेट्टी (तृतीय)

बारा  वर्षाखालील मुलांच्या गटात ई. अभिषेक-पनवेल  (प्रथम ),श्राव्य गावंड -पनवेल (द्वितीय),शिवम श्रीवास्तव (तृतीय ),आरीव प्रभाकर (चतुर्थ ),अभिलाष यादव (पंचम ) 

बारा  वर्षाखालील मुलींच्या गटात ज्ञानदा गुजराथी -कर्जत  (प्रथम ),अनुष्का नेरकर -पनवेल (द्वितीय).सई इनामदार(तृतीय),जस्विता चित्तुरी (चतुर्थ)या सर्वांना ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमानपत्रांचे वाटप करण्यात आले.



Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image