एजेएफसी पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर:मुंबई येथे पत्रकार मित्र सन्मान सोहळा

एजेएफसी पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर:मुंबई येथे पत्रकार मित्र सन्मान सोहळा

पनवेल  - भारतीय पत्रकार मित्रांची संघटना असलेल्या ऑल जर्नालिस्ट अॅड फ्रेंडस सर्कल संघटनेच्यावतीने राज्यात पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार जाहीर झाले आहेत

          मुंबई येथे होणाऱ्या पत्रकार मित्र सन्मान सोहळ्यामध्ये पनवेल येथील ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांना जीवन गौरव पुरस्कार, कोकणातील सावंतवाडी येथील अभिमन्यू लोंढे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार, कराड येथील अतुल होनकळसे यांना नानासाहेब जोशी संपादक पुरस्कार ,अकोट येथील राहुल कुलट यांना मधुकर लोंढे पत्रकार स्मृती राज्य पुरस्कार,रत्नागिरीच्या  संगमेश्वर येथील युयुस आर्ते यांना शरददादा बोरकर सामाजिक कार्यकर्ता राज्य पुरस्कार, बार्शी येथील गणेश गोडसे यांना नवीनचंद्र सोष्टे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत.

         रविवार दि.२७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता रिजाॅईस इंटरनॅशनल स्कूल,मालाड,मुंबई येथे हा पत्रकार मित्र सन्मान सोहळा होणार आहे.

       या सोहळ्यासाठी दैनिक पुण्यनगरीचे मुख्य राजकीय संपादक पद्मभूषण देशपांडे,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रायगडभूषण प्राध्यापक एल.बी. पाटील ,ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल उपस्थित राहणार आहेत.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image