शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा मदतीचा हात पुढे कळंबोलीतील दिव्यांग बांधवाला व्हीलचेअर दिली भेट
पनवेल : वार्ताहर
कळंबोली येथील दिव्यांग तरुणाला व्हील चेअरची आवश्यकता असल्याची बाब समोर येताच शिवसेनेचे रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी तात्काळ दखल घेत या तरुणाला खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये मंगळवारी अपंग सायकल म्हणजेच व्हील चेअर भेट दिली. कु. प्रवीण सरोज जैसवाल रा. कळंबोली असे या तरुणाचे नाव असून या व्हील चेअर भेटीने तो भारावून गेला. अनेक दिवस या तरुणाने अनेकांजवळ आपली इच्छा व्यक्त केली होती, मात्र ही बाब शिरीष घरत यांच्या कानावर येताच या तरुणाला मदतीचा हात पुढे करून व्हील चेअर भेट देण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा नेहमी गोरगरिबांना मदतीचा हात असतो याची पुन्हा एकदा प्रचिती झाली. त्यांच्या या भेटीने प्रवीण जैसवाल या तरुणाने त्यांचे आभार मानले. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, खांदा कॉलनी शहर समन्वयक गणेश परब यांच्यासह कळंबोली ग्रामस्थ उपस्थित राहिले होते.