जे.एम. म्हात्रे चॅरीटेबल संस्था व श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक संस्थेच्या वतीने रिटघर येथे मोफत ई- श्रमकार्ड बनविण्याच्या कार्याचा शुभारंभ
पनवेल : जे.एम. म्हात्रे चॅरीटेबल सामाजिक संस्था व श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने रिटघर येथे नागरिकांना मोफत ई- श्रमकार्ड बनविण्याचा कार्याचा शुभारंभ झाला
पनवेल रिटघर येथे श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक सुभाष भोपी आणि ...आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्रचे उपाध्यक्ष भारत भोपी या पिता- पुत्राच्या औदार्यातून आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून.व... केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतूनरिटघर,दूंदरे चिंचवली, शिवनसई आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्यां व आदिवासी बांधवांच्या भविष्यासाठी भारत सरकारच्या एका कल्याणकारी योजनेचं अर्थात *ई-श्रमकार्ड* बनवून देण्याचं आदर्शवत व प्रेरणादायी कार्य कार्ड बनवून घेणाऱ्या नागरिकांकडून कुठलाही मोबदला न घेता अगदी मोफत बनवून देण्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा शुभारंभ शिक्षक मतदार संघाचे दमदार आमदार बाळाराम पाटील प्रितमदादा म्हात्रे साहेब, सुभाष भोपी, राजू मुंबईकर राजेश केणी साहेब, भारत भोपी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
नेरे,दूंदरे,रिटघर आणि आजूबाजूच्या परिसरतील नागरिकांनां आणि आदिवासी बांधवांना त्यांच्या कठीण काळातं सदैव मदतीचा हात पुढे करत त्यांच्या सुख-दुःखात हाकेला धावून जाणाऱ्या ह्या *बाप-लेकाच्या*.. औदार्यातून ...आज पर्यंत अनेक सामाजिक कार्य साकारली गेलीत त्यातच आज आणखी एका साकारत असलेल्या ह्या आदर्शवत व प्रेरणादायी कार्यामुळे म्हणजेच ह्या मोफत *ई-श्रमकार्ड* बनवून देण्याच्या सत्कार्या मुळे या काबाड-कष्ट करणाऱ्या नागरिकांना आणि श्रमजीवी आदिवासी बांधवांना त्यांच्या भविष्यात त्यांना अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेता येईल सोबतच अपघाती विमा पॉलिसीच्या माध्यमातून जर एखाद्या कार्डधारक नागरिकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला *दोन लाख* रुपयांचा पिएमएसबीवाय विमा कव्हर मिळेल आणि एखाद्या कार्डधारकाला अंशतः अपंगत्व आल्यास त्या अपघातग्रस्त विमा धारकास *एक लाख* रुपायांचा विमा कव्हर मिळणार आहे.आणि म्हणूनच हे *मोफत ...ई-श्रमकार्ड* बनवून देण्याचा कार्यक्रम आजूबाजूच्या सर्व गावांत आणि आदिवासी वाड्यांवरील त्या आदिवासी बांधवांनां जो पर्यंत *ई-श्रमकार्ड* बनवून दिलं जाणार नाही तो पर्यंत हे कार्य अखंडपणे सुरू राहील असा... संकल्प.. *श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्था*....आणि ..*जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलच्या* वतीने *श्री सुभाषशेठ भोपी साहेब* आणि *श्री भारतदादा भोपी साहेब*... या ...*बाप-लेकान* जाहीर केला.
श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून... भारत सरकारच्या ई-श्रमकार्ड योजने अंतर्गत रिटघर आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांच्यां हितांकरिता साकारलेल्या ह्या प्रेरणादायी आणि अनोख्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी खास प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिले ते ...शिक्षक मतदार संघाचे कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष आमदार ...*मा.श्री बाळाराम पाटील साहेब*,पनवेल महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते ...*मा.श्री प्रितमदादा म्हात्रे साहेब*,केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक ...रायगड भूषण...*मा.राजू मुंबईकर साहेब, मा.श्री राजेशजी केणी साहेब, मा. श्री नामदेव शेठ फडके, मा .श्री विलास शेठ फडके*,(जि.प.सदस्य ), *मा.श्री शेखर शेळके, मा श्री देवा भाई पाटील ,मा .श्री वामणशेठ शेळके .मा .श्री महादेव गायकर,मा. श्री महादु पाटील ,मा .श्री गुरूनाथ उसाटकर ,मा.श्री दिलीप उलवे कर मा. श्री अभयजी ठाकूर* (ई-सेवा केंद्र चालक),* श्री बालाराम पाटील ,श्री बालाराम गवली, विष्णू शेळके ,मोहन भोपी, बालाराम फडके ,अनिल घरत* (उरण तालुका सचिव आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था),श्री विश्वासदादा पाटील*(नेरे विभाग अध्यक्ष मनसे), *श्री प्रदीपदादा पाटील* (नेरे-दूंदरे विभाग अध्यक्ष -आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था ),*अंकुरजी पाटील* शहर अध्यक्ष नवीन पनवेल - आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा .संस्था),*श्री झाकीरदादा काकर* व सर्व सहकारी मंडळी आणि रिटघर,दूंदरे गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांच्या व महिला भगिनींच्यां उपस्थितीत आणि उदंड प्रतिसादात हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.