पनवेलमध्ये आयपीपीएल; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन
पनवेल(प्रतिनिधी) इंटर पनवेल क्रिकेट कमिटी आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आयपीपीएल 'इंटर पनवेल प्रिमियर लीग २०२२' क्रिकेट स्पर्धेला आज(दि. १९) पासून पनवेलमध्ये सुरुवात झाली असून या स्पर्धेचे उदघाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.