पनवेल तहसील कार्यालयामार्फत कुपोषित व कमी वजनाची ४७ बालकांना पोषण पोटलीचे वाटप

पनवेल तहसील कार्यालयामार्फत कुपोषित व कमी वजनाची ४७ बालकांना पोषण पोटलीचे वाटप



पनवेल : रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. महेन्द्र कल्याणकर यांच्या निर्धारातून अदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून केलेल्या सप्तसुत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीचा भाग म्हणून कातकरी उत्थान अभियानातंर्गत पनवेल तहसील कार्यालयामार्फत कुपोषित व कमी वजनाची ४७ बालकांना अन्नदा या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पोषण पोटलीचे वाटप ग्रामपंचायत सुकापूर याठिकाणी करण्यात आले.

         पोषण पोटलीमध्ये सुष्म मिश्रीत मकईसोयाव गहू यांचे लाडूडाळसोया व मल्टिग्रेन खिचडी व चिवडा चिक्कीभाजलेले चणेराजगिराखजूर रोलचित्रकला पुस्तकेकलर फेस मास्क या सर्व वस्तूचा सामावेश करण्यात आला आहे. पोषण पोटली सुकापूर भागातील ४७ कमी वजनाच्या बालकांना तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. पनवेल तालूक्यातील उर्वरीत सर्व कमी वजनाच्या लाभार्थ्यांना टण्याटप्याने पोषण पोटलीचे वाटप करण्यात येणार आहे. अदिवासी बांधवांच्या सर्वांगीन विकासासाठी शासनाच्या प्रत्येक विभागातून सकारात्मक काम झाले पाहिजे असे अवाहन यावेळी पनवेल तालूक्याचे तहसिलदार विजय तळेकर यांनी केले. तसेच बेटी बचाव व बेटी पढाव अभियानातंर्गत मुलींना सुखरूप जन्म दिलेल्या पालकांचे अभिनंदन प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तीपत्रक देवून तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. चेतन गायकवाडबाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी उपस्थितांना आहारआरोग्य व स्वच्छता या विषयाबाबत मार्गदर्शन केले. तसेच बेटी बचाव बेटी पढाव शपथ घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

       कार्यक्रमाला अन्नदा संस्थेचे संजय मिश्रामहिला विकास संस्थेकडून म्हात्रेपंचायत समितीचे विस्तार अधिकारी घरततलाठी जोशीग्रामविकास अधिकारी सुदिन पाटीलपर्यवेक्षिका तांडेल व गांधी उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत सप्तसुत्री अन्वये मौजे मालडुंगे  तालुका पनवेल येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये MGM हॉस्पिटलतालुका आरोग्य अधीकारीप्राथमिक आरोग्य केंद्र नेरे यामधील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे साहाय्य लाभले.

 

 

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image