तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या प्रयत्नाने कानपोली गाव शिवसेनामय-शेकडो कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधले शिवसेनेचे शिवबंधन

कानपोलीमध्ये भाजपाला खिंडार; सरपंचासह उपसरपंच, सदस्य शिवसेनेत 


तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या प्रयत्नाने कानपोली गाव शिवसेनामय-शेकडो कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधले शिवसेनेचे शिवबंधन 

पनवेल(प्रतिनिधी)-  नुकत्याच पनवेल तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कानपोली ग्रामपंचायतीचा समावेश आहे. मात्र निवडणुकांपूर्वीच या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी शेकडो सहकाऱ्यांसह राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मुंबईतील शिवनेरीवर जाऊन शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या प्रयत्नाने संपूर्ण कानपोली गावात भाजपला खिंडार पडले असून संपूर्ण कानपोली गाव शिवसेनामय झाले. 

       शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन व शिवसेनेचे कोंकण विभाग संपर्क नेते तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामपंचायत कानपोली येथील भाजपच्या सरपंच सौ. विजया कैलास पाटील, उपसरपंच नागा गिरा, सदस्य हिरामण उघडा व त्याच्या शेकडो सहकार्यानी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करून आपल्या मनगटावर शिवबंधन बांधले. सदर कार्यक्रमात रायगड उपजिल्हा संघटक परेश पाटील, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका सन्मवयक प्रदीप ठाकूर, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, उपशहर प्रमुख नविन पनवेल ज्ञानेश्वर भंडारी, शाखा प्रमुख कानपोली प्रदीप पाटील, शाखा प्रमुख वावंजे सतिश पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.