दिव्यांग, मास्टर्स व ज्युनियर "महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरशौष्ठव स्पर्धा
पनवेल : खारघर येथे महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन आयोजित दिव्यांग, मास्टर्स व ज्युनियर "महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरशौष्ठव स्पर्धेला विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी भेट दिली व विजेत्या स्पर्धकांना चषक प्रदान करून शुभेच्छा दिले.
यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह इंडियन बॉडीबिल्डर फेडरेशनचे मधुकर तळवलकर, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी चेतन पाठारे, महाराष्ट्र बॉडीबिल्डींग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत आपटे, वर्ल्ड बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे लिगल अँडव्हायझर विक्रम रोठे, इंडियन बॉडी बिल्डींग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी हिरल शहा, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि बॉडीबिल्डर सुभाष पुजारी तसेच स्पर्धक व प्रेक्षक उपस्थित होते.