ऑनलाईन सभेचा अजेंडा असताना अधिकारी व स्थायी समिती सदस्य हे प्रत्यक्ष सभागृहात कसे बसू शकतात- विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांची कारवाईची मागणी

 ऑनलाईन सभेचा अजेंडा असताना अधिकारी व स्थायी समिती सदस्य हे प्रत्यक्ष सभागृहात कसे बसू शकतात- विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांची कारवाईची मागणी

 
     पनवेल : पनवेल महानगरपालिका स्थायी समितीच्या सभेचे सचिव कार्यालयामधून सूचना काढून ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते. मुळातच कोविड नियमांचे पालन व्हावे यासाठी सदर स्थायी समिती सभा ही शासन निर्णयानुसार ऑनलाईन घेणे बंधनकारक आहे. असे असताना देखील पालिकेतील स्थायी समिती सभेच्या वेळेची परिस्थिती पहिली असता पालिकेचे अधिकारी अगदी खुर्ची ला खुर्ची लावून कोविड नियमांचे उल्लंघन करत बाजू बाजूला बसले होते. त्यातच कर म्हणजे महापालिकेचे सभागृह नेते ऑनलाईन सभा असताना तिथे हजर होते.

 विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्र इकडून तिकडून स्वतः विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक ३ जो विरोधी सदस्यांचे मत विचारात न-घेता केवळ दडपशाहीने सदर विषय रेटून नेत होते. सभापतींना ऑनलाईन सभेत सातत्यांने आमचे सर्व सदस्य सदर विषयासाठी मतदान घ्यावे ही विनंती करत असताना सभापती मात्र सभागृहात उपस्थित सदस्याच्या म्हणण्या प्रमाणे सदर विषय मंजूर अश्या प्रकारची घोषणा करत होते.  पटलावरील पुढील विषय क्र.४ व ५ ते देखील आमचे कोणतेही मत विचारात न-घेता विषय मंजूर करून घेतले. विषय क्र.३ हे मतास घ्यावे हे सांगण्यासाठी मी व माझे सहकारी स.स.गणेश कडू आम्ही सभागृहात प्रवेश केला असता वर उल्लेखलेली परिस्थिती सभागृहात आम्हास पहावयाला मिळाली. याचा जाब मी विरोधी पक्ष नेता म्हणून सन्मानीय उपायुक्त सचिन पवार यांना विचारला असता सदर विषयात ऑनलाईन सभेत सदस्याला बोलावून सभागृहात बसायला देणे  हे सभापतींचे अधिकार आहेत अशा प्रकारचे उत्तर दिले.
तरी ऑनलाईन सभेचा अजेंडा असताना सभेत अधिकारी व स्थायी समिती सदस्य हे प्रत्यक्ष सभागृहात कसे बसू शकतात? वरील विषयाबाबत उपायुक्तांनी सांगितल्याप्रमाणे सभापतींच्या अधिकाराचा शासन निर्णय असेल तर माहितीसाठी मला द्यावा. अन्यथा शासन निर्णय तोडून प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. असे प्रितम जनार्दन म्हात्रे, विरोधी पक्ष नेता 
पनवेल महानगरपालिका यांनी म्हटले आहे
     

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image