आद्य क्रांतिवीर फडके नाट्यगृहात लतादीदींना वाहन्यात आली संगीतमय श्रद्धांजली,

आद्य क्रांतिवीर फडके नाट्यगृहात लतादीदींना वाहन्यात आली संगीतमय श्रद्धांजली,



पनवेल : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना शुक्रवारी संध्याकाळी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'तुम मुझे यू भुला ना पाओगेया सांगितिक कार्यक्रमातून श्रद्धांजली वाहिली. यावेली लतादीदींच्या निवडक गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. ज्येष्ठ संगीत संयोजक अजय मदनगायिका संगीता मेळेकरमिथिला माळीप्राजक्ता सातर्डेकरनिवेदक आर. जे. गौरव यांसह वाद्यवृंदाने सादर केलेल्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

         या वेळी आमदार बाळाराम पाटीलमाजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रेउरणचे माजी आमदार मनोहर भोईरकाँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरतउद्योजक दिलीप पाटीलशेकाप नेते नारायण घरतकाशिनाथ पाटीलआर. सी. घरतसाई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवींद्र पाटीलसुदाम पाटीलरामदास शेवाळेकाँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी आदींसह संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             लतादीदींच्या जाण्याने संगीतविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. लतादीदींच्या गाण्यांतून सांगितिक श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पनवेल व उरण तालुक्यातील नागरिकांना लतादीदींच्या गाण्यांचे प्रेम देण्याचा प्रयत्न कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलाअसे पालिकेचे विरोधी पक्षनेते तथा जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.