भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयुष मंत्रालय, पतंजली संस्था आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा महायज्ञ

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयुष मंत्रालय, पतंजली संस्था आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा महायज्ञ



वार्ताहर पनवेल- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयुष मंत्रालय, पतंजली संस्था आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा सूर्यनमस्कार महायज्ञ 2022 हा उपक्रम देशभरासाठी आयोजित केला आहे.

      एक ते सात फेब्रुवारी म्हणजे माघ शु.प्रतिपदा ते रथसप्तमी हा कालावधी यासाठी निश्चित केला आहे. पश्चिम पनवेल (जुने पनवेल) या ठिकाणी विविध 17 ठिकाणी या सूर्यनमस्काराचे केंद्रे चालतात. यामध्ये रा. स्व संघ , योग केंद्र आणि राष्ट्र सेविका समिती काही व्यवसायिक अस्थापना व काही मंडळे अशा ठिकाणी ही केंद्रे चालतात आज आज रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2020 रोजी पनवेल मधील वडाळे तलावाजवळील नव्याने बांधण्यात आलेल्या प्लॉटवर सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेमध्ये या 17 केंद्रांमधील 4 वयापासून 74 वया पर्यंतचे एकूण 93 जण सहभागी झाले होते या ठिकाणी 11 बाल त्यांनी एकूण  1360 सूर्यनमस्कार घातले, तरुण 51 त्यांनी 2125 सूर्यनमस्कार घातले तर महिला विभाग,(मातृशक्ती) 31 उपस्थित होत्या त्यांनी 2061 सूर्यनमस्कार घातले अशाप्रकारे 5536 असे एकूण सूर्यनमस्कार घालण्यात आले.श्री.मुरलीधर ढाके यांनी सर्वात जास्त 171सूर्यनमस्कार घातले.

      वडाळे तलावाच्या प्लॉटवर संपूर्ण आसमंत सूर्यनमस्कारमय झालेला दिसत होता. अशा या पुरातन व्यायाम पद्धतीला यानिमित्ताने चांगला उजाळा मिळताना दिसत आहे. याच कालावधीत पनवेलमध्ये अन्य चार ठिकाणी सूर्यनमस्कार घालण्यात आले *कल्पतरू वॉटर फ्रंट 11 जणांनी 132. वीर तायक्वांदो अकॅडमी 18 विद्यार्थ्यांनी 425, गोदरेज स्काय गार्डन सहा जणांनी 57, व रामदास मारुती मंदिरात 12 महिलांनी 372 सूर्यनमस्कार घातले.

     उद्या रथसप्तमीला या सूर्यनमस्कार महायज्ञाची सांगता होणार आहे व अशा प्रकारे संपूर्ण भारतभर पंचात्तर कोटी सूर्यनमस्कारांचे लक्ष सहजपणे पूर्ण केले जाईल हे निश्चित. या सूर्यनमस्कारांनंतर  सर्वानसाठी चहापान वगैरे कार्यक्रम झाला. आणि या संपूर्ण काळात वेगवेगळ्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.